नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमाचा माजी विद्यार्थी डॉक्टर यश ज्ञानोबा महाजन याने एम .बी. बी. .एस .या वैद्यकीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला . त्याने मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार सरांच्या हस्ते रोपटे देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
यश हा अतिशय नम्र, आज्ञाधारक व प्रामाणिक विद्यार्थी आहे. त्याने अत्यंत कठीण आणि महत्वपूर्ण शैक्षणिक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार तसेच यशचे वडील श्री. ज्ञानोबा महाजन व आई सौ. संगीता महाजन उपस्थित होत्या. यशने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे वडिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे कौतुक केले .यशला लहानपणापासूनच त्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळेचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.संस्कार हे फक्त घरातूनच होतात असे नाही तर शाळा सुद्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास साठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावित असते. आमच्या यशचे शिक्षण लहान गटापासून इयत्ता दहावीपर्यंत नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमा मध्येच झाले शाळेने केलेल्या संस्कारामुळेच त्याने हे आज यश संपादन केले आहे. शाळेचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात या प्रति त्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्री.अधिकराव पवार सरांनी यश प्रमाणेच अनेक विद्यार्थी आजपर्यंत शाळेने घडविले आहेत या शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.
याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक श्री अधिक राव पवार सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या वतीने यशचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.