जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचे सन्मान राखत सामाजिकतेचा संदेश या दोन्ही कुटुंबांनी दिला .
आज पर्यंत लग्नाच्या याद्यावर पुरुष सह्या करताना दिसून येत आहेत. ही आपल्या येतील आज पर्यंतची परंपरा आहे .पण जागतिक महिला दिनाच्या निमित्त आपल्याच महिलांचा सन्मान राखता यावा. यासाठी चिपरी येथील कुमार पाटील आणि इचलकरंजी येथील सुनील चौगुले या कुटुंब यांनी एकत्रित एक निर्णय घेतला. या दोन्ही कुटुंबांनी महिलांची हस्ते लग्नाच्या याद्या लिहिल्या व या याद्यांवर दोन्ही कुटुंबातील महिलांची नावे व स्वाक्षऱ्या घेतल्या.
यावेळी कुमार पाटील यांच्या सुनबाई शर्वरी पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला यावर कस्तुरी पाटील, उमा खोत ,सुनीता पाटील ,सोनाली आवटी ,अनिता पाटील ,शोभा चौगुले ,सारिका तारे,पायल मोकाशी ,सुजाता कल्याणी ,प्रभावती चौगुले यांच्या साक्षर या घेण्यात आल्या.