लहान मुलं कित्येकदा काय करतील याचा नेमच नसतो.कधी खोडकर ,कित्येकदा निरागस, कित्येकदा भन्नाट आणि कधी गोड कृती मधून सर्वांचे मन जिंकतात. कधी खोडसाळपणा करून सर्वांना हसवतात तर कित्येकदा सर्वांची बोलती बंद करतात .
अशीच अजब घटना घडली अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यामध्ये माउंट प्लेजन्स परिसरातील पोलिसांना एक फोन आला हा फोन या महिला पोलिसांनी उचलला यावेळी या महिला पोलिसांनी कोण बोलतोय हे विचारल्यावर दुसऱ्या बाजूने एक छोटा मुलगा आपली तक्रार या महिला पोलिसांना सांगतो
माझी आई माझ्याशी खूप वाईट वागते, काय झाले असे पोलिसांनी त्या मुलाला विचारल्यानंतर तो म्हणाला की तुम्ही "या आणि माझ्या आईला घेऊन जा"
या दरम्यान त्या मुलाची आहे त्या मुलाच्या हातातील फोन घेते आणि ती त्यांना सांगते की हा चार वर्षाचा मुलगा आहे मी त्याचे आईस्क्रीम खाल्ले म्हणून त्यांनी तुम्हाला कॉल केलेला आहे.
त्यानंतर घडलेल्या घटनेची खात्री करण्यासाठी दोन महिला पोलीस अधिकारी मुलाच्या घरी पोहोचल्या हे प्रकरण फक्त आईस्क्रीमशी संबंधित आहे .गंभीर काही नाही मुलाच्या आईने आईस्क्रीम खाल्ले म्हणून तो मुलगा नाराज होता. परंतु पोलीस घरी आल्यावर आईने जेलमध्ये जावे असे त्या लहान मुलाला वाटत नाही. ही घटना झाल्यानंतर दोन दिवसानंतर पुन्हा पोलीस मुलाच्या घरी गेले आणि त्यांनी मुलाला आईस्क्रीम देऊन आश्चर्यचकित केले