उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे . त्याचबरोबर बाजारामध्ये लिंबूचा भाव ही दिवसेंदिवस कडाडलेला दिसून येत आहे. आवक कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात एक लिंबू पाच ते दहा रुपयाला नग मिळताना दिसून येत आहे
महिन्याभरामध्ये लिंबूची मागणी वाढल्यामुळे भावामध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून आलेली आहे साधारण जून पर्यंत कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या घरगुती वापराबरोबरच हॉटेल रसवंतीगृह आणि ज्यूस सेंटर मध्येही लिंबूची मागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे.