पुण्यातील कुविख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारलेला सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात आणलेल्या आहे .भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी मकोका अंतर्गत त्याच्यावर पुणे पोलीस यांनी कारवाई केली .पाच दिवसापासून मारणे याचा मुक्काम कारागृहात आहे. त्याची रवानगी चांगली कारागृहात होतास त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यात बाहेरून सुरक्षा कर्मचारी मागवण्यात आलेले असून त्यांना सांगली कारागृहात तैनात करण्यात आलेले आहे .
मारणे टोळीतील गुंडाने कोथरूड परिसरात पुण्यातील भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली होती त्यानंतर गुंड गजा व त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती .त्यानंतर त्याला सांगलीमध्ये आणण्यात आलेले आहे. गजा मारणे हा विख्यात गुंड असल्याने त्याचे विरोधात अनेक जण आहेत पुण्यामधील कारागृहात त्याला इतरांच्या बरोबर ठेवणे हे त्याच्याविरोधी गुंड लोक त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता असल्यामुळे त्याला सुरक्षित अशा अंडा सेलमध्ये ठेवले जाणार होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलीस त्याला येरवडा कारागृहात नेले परंतु येरवडा कारागृहात अंडा सेलमध्ये जागा नसल्यामुळे त्याला येरवडा कारागृहातील प्रशासनाने त्याला तेथे ठेवण्यात जागा नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची रवानगी सांगली मधील कारागृहात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.