तुमचा सिबिलचा स्कोर जर खराब असेल तर त्याचे कारण पुढे करत संबंधित बँका ग्राहकाला कर्ज नाकारू शकतात पण तुमचा सिबिल खराब असेल तर आता यापेक्षाही मोठे नुकसान तुमचे होऊ शकते.
मूर्तिजापूर शहरांमध्ये दोन कुटुंबामध्ये मुलगा मुलींच्या विवाहाची बोलणी सुरू होते .दोन्ही घरातील सर्वांना मुलगा मुलगी पसंत पडली मुलाला मुलगी एकमेकांना पसंत पडली.घरच्यांनाही मुलगा मुलगी पसंत बाकीच्या सर्व गोष्टींची चर्चा सुरू झाली, आता शेवटच्या क्षणी विवाहाची बोलणी होत आलेली असतानाच या बैठकीमध्ये मुलीच्या मामाने सर्वांसमोर एक आग्रह धरला की मुलाचा सिबिल स्कोर तपासावा. मुलीच्या मामाचा हा आग्रह सर्वांनी मान्य केला आणि त्या मुलाचा सिबिल स्कोर तपासला.
सिबिल स्कोर तपासताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या मुलाचा सिबिल स्कोर हा खराब होता.
या सिबिल स्कोर च्या माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद सर्वांच्या समोर आला त्यांच्या कुटुंबांना सुद्धा यामध्ये काहीच पुढे बोलता आले नाही मात्र बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेचा धडा यामधून मिळाला.