चेहरा बघण्यासाठी नव्हे तर या कारणांसाठी लिफ्ट मध्ये आरसा लावलेला असतो

Admin
By -





आज-काल इमारतींच्या जंगलामध्ये उंच उंच गगनचुंबी इमारती आजकाल आपल्याला दिसून येतात ,इतक्या उंच इमारतीमध्ये वर खाली करण्यासाठी आता छान लिफ्ट असते त्या कधी मोठ्या तर कधी छोट्या असतात पण आता या सर्व लिफ्टमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे आरसा.
प्रत्येकाला वाटते की लिफ्ट मध्ये आत गेल्यानंतर आपण कसे दिसतो हे बघण्यासाठी तो आरसा लावलेला असतो. लिफ्ट मध्ये आरसा असल्याचे हे एक कारण असू शकते . पण लिफ्ट मध्ये आरसा किंवा काच असणे हे लोकांचे मानसिक स्वास्थ सुधारते हा खरा या मागचा उद्देश आहे. ची. क्लॉस्टोफोबिया या शब्दाचा अर्थ असा आहे की लहान किंवा अरुंद जागेचे लोकांना भीती वाटणे. अनेकदा लोक लिफ्ट किंवा लहान ठिकाणी जाण्यापासून घाबरतात त्यावेळी अनेकांना तेथे गुदभरू लागते . त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. अशावेळी आरसा लिफ्ट मध्ये लावल्यामुळे लिफ्टच आकार हा मोठा वाटतो. तसेच लिफ्ट मध्ये आरसा लावल्यामुळे लोकांचे लक्ष आरशाकडे आपल्या स्वतःला बघण्याकडे जाते. त्यामुळे आपण लिफ्ट मधून किती उंच वर जातो किंवा खाली येत आहे याची भीती व्यक्तिमध्ये राहत नाही.
तसेच लिफ्ट मध्ये आरसा लावण्याचे आणखीन एक सर्वात मोठे कारण म्हणजे लिफ्ट मध्ये जर एखादी कोणी अनोळखी व्यक्ती आली ती जर तुमच्या किमती वस्तूची चोरी करणारा असेल तर या आरशांमुळे आपल्या मागे पुढे आणि आजूबाजूला कोण उभे आहेत ते काय करत आहेत हे आपल्याला लगेच कळते.

या सर्व गोष्टींसाठी लिफ्ट मध्ये आरसा किंवा काच लावलेली दिसून येते.