दादा मामा काका नावाचा नंबर प्लेट्स आता रडावर

Admin
By -
1 minute read





          दोन चाक चार चाकी गाडी आपली असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते .त्या गाडीवरती फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचे वेळ आज काल वाढताना दिसून येत आहे अशाच फॅन्सी नंबर प्लेटच्या किमतीही  जास्तच आहेत ,मात्र अशा नंबर प्लेटवर आता कारवाई होणार आहे काका मामा दादा नावाच्या नंबर प्लेट्स आता रडारवर आहेत. परिवहन आयुक्तालयाच्या सूचनेनुसार सर्व आरटीओ मार्फत 18 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2019 नंतरच्या एच एस आर पी नसलेल्या गाड्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते राज्यात 2019 नंतर नोंदणी झालेल्या नवीन वाहनांच्या एच एस आय पी लावणे बंधनकारक असताना अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरटीओच्या निदर्शनास आलेले आहे.
एप्रिल 2019 अगोदर नोंदणी झालेल्या गाड्यांवर एच एस आर पी लावल्यास 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आले असून त्यानंतर मोटर वाहन कायदा कलम 177 नुसार एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे सुमारे दोन कोटी गाड्याची राज्यात नोंदणी 2019 पूर्वी झालेली असून या सर्व गाड्यांना एच एस आर पी लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे .यासाठी आता 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे परंतु 2019 पूर्वीच्या फॅन्सी नंबरच्या गाड्या रस्त्यावर धावत असल्याने केवळ अशाच गाड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे