10 फेब्रुवारीला सांगली मधील कृष्णा महोत्सवाला उद्योग मंत्र्यांसह पालकमंत्र्यांची कृष्णामाई भेट,
7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान सांगलीत उत्साहात धार्मिक वातावरणात आणि सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उदंड प्रतिसादात कृष्णमाई महोत्सव सुरू आहे.
सोमवारी राज्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी या महोत्सवास भेट देऊन कृष्णामाईची आरती केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,नदी ही त्या भागासाठी जीवनदायींनी असते कृष्णा नदीला तर पूर्वीपासून एक विशिष्ट असं धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या नदीचे अनेक उपकार कृष्णा तीरावर राहणाऱ्या लाखो नागरिकांच्यावर आहेत. या उपकारामधून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचा सिंहाचा वाटा आहे,कारण त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिका प्रशासन आणि श्री गणपती पंचायतनशी संवाद साधून या महोत्सवाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्याचे सांगत मंत्री सामंत यांनी महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या कृष्णामाई महोत्सवास भेट देऊन, चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचे कौतुक करून, सदर महोत्सवासाठी डीपीडीसी मधून भरघोस असा निधी देण्याचे आश्वासनही यावेळी दिले आहे.