पोलिसांनी सुरू केली आरोपी दत्तक योजना

Admin
By -




कोल्हापूर पोलिसांनी सुरू केली आरोपी दत्त की योजना

सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आरोपी दत्तक योजना सुरू केलेली आहे

   कुठेही गुन्हा घडला त्यानंतर त्याचा तपास करणे ,दोषींना पकडणे आणि त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे हे काम पोलिसांनाच करावे लागते .मात्र गुन्हे वाढू नयेत यासाठी ही खबरदारी त्यांनाच घ्यावी लागते .अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण होते .कित्येकदा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करतात .त्यामधून त्यांच्या टोळ्याही निर्माण होतात परिणामी गुन्ह्याचे प्रमाण हे वाढताना दिसून येते या सर्वाला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत आरोपी दत्तक योजना ची संकल्पना मांडली त्यांच्या या संकल्पनेनुसार गेल्या आठवड्यापासून या योजनेची सुरुवात झाली 
          या योजनेमध्ये जिल्ह्यातील 63 अधिकारी आणि 580 अंमलदारांकडे 1526 आरोपींची जबाबदारी देण्यात आलेली आहे .आरोपींची संपूर्ण माहिती घेण्यापासून त्यांच्यावरील हालचालीवर बारीक नजर ठेवणे ,त्याला गुन्हा पासून परावृत्त करणे, प्रबोधन करण्याचे काम पोलिसांकडून केले जाणार आहे त्यातून गुन्हे कमी होतील शिवाय आरोपींना सुधारण्याची संधी देखील मिळेल असा विश्वास यावेळी अधीक्षक पंडित यांनी व्यक्त केलेला आहे. 
दत्तक योजनेतून पोलिसांनी आरोपींची कुंडली तयार केलेली असून त्यामध्ये त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर ,व्यवसाय ,नातेवाईक ,मित्र आदींच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कामकाजाची स्थिती गुन्ह्याची पद्धत अशा अनेक सविस्तर माहिती पोलिसांनी घेतलेली आहे यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यास स्वतंत्र दळजिस्टर असून त्यात भेटीचा तपशील नोंदवावा लागेल आणि याची माहिती वरिष्ठांना वेळोवेळी कळवावे लागेल.