चालू वर्षात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने 7 हजार रुपये ठेवण्याचा निर्णय ढगेवाडी (तालुका वाळवा) येथील ग्रामपंचायतीने घेतलेला आहे अशी माहिती गावचे सरपंच संदीप सावंत यांनी दिलेली आहे
"राजमाता जिजाऊ लाडकी सुकन्या योजना "या नावाने हि योजना राबविण्यात येत आहे . सन 2024 या वर्षभरात 5 हजार रुपयाची ठेव ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतने घेतलेला होता. त्यानुसार वर्षभरात या गावांमध्ये सात अपत्ये जन्माला आली त्यापैकी स्वामींनी निलेश माने ही एकमेव मुलगी होती. ही मुलगी असल्याने या सुकन्याच्या नावाने ठेव ठेवण्यात आली .यावर्षी ठेवीची रक्कम वाढवून 7 हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे .ढगेवाडी हे गाव पुरोगामी विचारसरणीचा इतिहास असणारे गाव असून सुमारे दोन हजार लोकसंख्येच्या या छोट्या गावात मुलींचा जन्मदर वाढावा व समाजात महिलांना मान सन्मानाची वागणूक मिळावी, या हेतूने या योजना राबविण्यात येत आहेत. भविष्यात ही रक्कम आणखीन वाढवण्याचा विचार असल्याचेही सरपंच यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच स्नेहलता माने संदीप काईंगडे विष्णू सावंत कृष्णा ढगे पाटील कमल माने, धनश्री लवंद रंजना खोत ग्रामसेविका लतिका जाधव या उपस्थित होत्या.