ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनतर्फे पत्रकार दिन व गुणवंतांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
मिशन चौक येथील वानलेस हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेल्या बायसिंगर लायब्ररीमध्ये सालाबादप्रमाणे ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनतर्फे पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुध्द . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली सिव्हिलचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम हे उपस्थित होते. सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना शिंदे (शिंदे गट) यांची उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी शाहीन शेख यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी २०२५ चे अमन एक्सप्रेस दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास पत्रकार , अनेक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.