जावयाला राग आला आणि

Admin
By -


मुलीच पाहिले ना आता जा असे म्हटल्याचा राग मनात धरून जावयाने सासूवर सत्तुरने हल्ला करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला हि घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बामणी (तालुका खानापूर) येथे घडली .या हल्ल्यामध्ये वैशाली अर्जुन कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून हललेखोर जावई ऋषिकेश अशोक कुंभार (रा जुना देगाव नाका, साठे पाटील वस्ती ,सोलापूर )यांच्याविरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
      याबाबतची अधिक माहिती अशी की बामणी येथील वैशाली कुंभार यांची मुलगी ऋतुजा हिचा विवाह ऋषिकेश कुंभार यांच्याशी झाला होता त्यांना मुलगी आहे. परंतु या दोघांच्या घटस्फोटासाठी विटा न्यायालयात खटला सुरू आहे .शुक्रवारी दुपारी संशयित ऋषिकेश हा पत्नी व सासू राहत असलेल्या बागणी येथील उदगीर हॉटेल जवळ आला. त्यावेळी त्यांने मला माझ्या मुलीला पाहायचे आहे असे सांगितले त्यानंतर काही वेळाने सासू वैशाली यांनी तुमचे मुलीला पाहून झाले असेल तर इथून जा असे  सांगितले. त्यांच्या या बोलण्याचा राग आल्याने तू माझा संसार मोडतेस तुला आता जिवंत ठेवत नाही असे म्हणून पाटीला अडकून आलेला सत्तुर शटातून बाहेर काढून ,सतुर ने सासू वैशाली यांच्या मानेवर पाठीवर तसेच डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून गंभीर जखमी करीत खून करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पत्नी ऋतुजा ऋषिकेश कुंभार यांनी विटा पोलिसात फिर्याद दिलेली आहे.