सुरज फाउंडेशन तर्फे कै. बबीताई सुरजमलजी लुंकड पुरस्कृत यंदाचा समाजभूषण पुरस्कार पालवी संस्थेच्या संस्थापिका सौ मंगलताई शहा यांना जाहीर झाला आहे.
सुरज फौंडेशन ही संस्था सन 1994 पासून शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेत आहे. या संस्थेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या सामाजिक कार्यात घौडदोड करणाऱ्या व प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या महिलांना पुरस्कार 2019 सालापासून दिला जात आहे.
पंढरपूर मधील सौ मंगलताई शहा यांना गेली पन्नास वर्षे एच.आय.व्ही सह जगणाऱ्या बालकांना व स्त्रियांना शिक्षण व स्वावलंबन देऊन आपल्या हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी संस्थेमार्फत विशेष बालकांना आधार देणाऱ्या सामाजिक कार्यासाठी समाजभूषण या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रुपये 25 हजार, सन्मानपत्र व मानचिन्ह असेल. सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी ठीक 04 वाजून 30 मिनिटांनी ललित कला अकॅडमी मध्ये होईल.
या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक ज्वलंत विषयावर प्रभावी व ह्रदयस्पर्शी मार्गदर्शन करणारे शिवम प्रतिष्ठान घारेवाडी चे संस्थापक मा.डॉ. श्री इंद्रजीत देशमुख यांचे 'आई' या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड,संस्थेचे सचिव एन. जी.कामत, चेअरमन यशवंत तोरो, शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील, सुरज फौंडेशनच्या संचालिका संगीता पागनीस, मुख्याध्यापक अधिकराव पवार व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.