लोणावळ्या मधील एकविरा गडावर हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाकडे फोडल्यामुळे तेथे जवळच असणाऱ्या मधमाशांच्या पोळ्याला या फटाकड्यांच्या धुरामुळे इजा पोहोचली त्यानंतर मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला . मधमाशांनी भाविकांचा चावा घेतला यामध्ये भाविकांनी पळापळ केले तर बहुतेक भाविकांना मधमाश्याने चावा घेतल्यामुळे जखमी झालेले आहेत.
मुंबईच्या कुलाबा येथील देवीची पालखी आली होती त्या पालखीतल्या काही भक्ताने फटाकडे वाजवले तर काहींनी फटाकडे वाजवले तर याचा फटका बाकीच्या भक्तांना बसला. मात्र गडावर फटाके वाजविण्यास बंदी असतानाही काही भावीकांनी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
मधमाशांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या भाविकांना तळा प्रार्थमिक आरोग्य केंद्रात उपचरासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर तातडीने उपचार करून ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही काळ निरक्षणास खाली ठेवून मग डिस्चार्ज देण्यात येणार आहे तर काहींच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलेले आहे