नव कृष्णा व्हॅली गुरुकुलला भीमान महेंद्रकुमार पोडिकजी यांचेकडून ग्रंथदानाचा अनमोल खजिना

Admin
By -



         नव कृष्णा व्हॅली गुरुकुल या शैक्षणिक संस्थेस भीमान महेंद्रकुमार पोडिकजी यांच्या हस्ते ग्रंथदानाच्या रूपाने अनमोल ग्रंथसंपदा प्राप्त झाली. या ग्रंथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ज्ञानस्रोत उपलब्ध होणार आहे.
          दरवर्षी संस्थेच्या मार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील उच्चतम समाजभूषण पुरस्कारा दिवशी  या ग्रंथांचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे लंकेश्वरकर सर उपस्थित होते. त्यांनी या अनमोल ग्रंथसंपदेचे महत्त्व पटवून दिले व या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

            या ग्रंथांच्या मदतीने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गाला ज्ञानार्जनाचे नवे क्षितिज खुले होणार आहे. या दानामुळे शाळेचा ग्रंथभांडार समृद्ध झाला असून याचा लाभ संपूर्ण शैक्षणिक समुदायाला होणार आहे.

             नव कृष्णा व्हॅली गुरुकुलचे संस्थापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोडिकजी यांचे आभार मानले असून, त्यांच्या या उदारतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. या दानामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रवाहात नवउमेद निर्माण होणार असल्याचे संस्थेचे मत आहे.

                ग्रंथदानाचा हा स्तुत्य उपक्रम अन्य दात्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. सदर ग्रंथदान प्रसंगी संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक आदरणीय प्रवीण जी लिंकड सर संस्थेचे सचिव आदरणीय एनजी कामत सर संस्थेच्या संचालिका प्राचार्य सौ संगीता पागनीस मॅडम मॅडम व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.