स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
दि. ०८/१/२०२५ रोजी रात्री आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदीराचा वरील बाजुचा बंद दरवाजाउघडुन अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून मंदीरातील देवाच्या अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. सदरबाबत शितल आण्णासो उपाध्ये, (वय ६० वर्षे, रा. महावीर चौक, अरग, ता. मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मंदीरात चोरी करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, सदरचा मंदीरातील चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मंदीरात चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. १२/०१/२०२५ रोजी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अक्षय मोरे, रा पलुस यांने आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदीरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करणेकरीता पाचवा मैल येथील पलुस रोड परीसरात मोटार सायकलीवरून फिरत आहे.
नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावून पाचवा मैल येथे जावून पलुस रोड परिसरात सापळा रचून थांबले असता पाठीवर सॅक असलेला एक इसम मोटार सायकलवर बसलेला दिसला. सदरचा इसम रेकॉर्ड वरील असल्याने त्यास ओळखून सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अक्षय अर्जुन मोरे, वय- २७ वर्षे, रा. गोंदीलवाडी रेल्वे गेट, पलुस आमणापुर रोड, ता. पलुस, जि. सांगली असे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता
१)७,४९,४००/- रू. किंमतीचे १०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात मणीमगंळसुत्र, गंठण, डोर्ले जु.वा.किं. अं.
२) १,४०,०००/- रू. किंमतीचे १.५ किलो वजनाचे चांदीचे दागिने त्यात ३ मोठे हार आणि मेखलाजु.वा.किं. अं.
३) ६५,०००/-रू. एक बजाज कंपनीची पल्सर २२० सीसी काळया रंगाची मोटार सायकल जु. वा. किं. अं.
९,५४,०००/-रू. एकूण (नऊ लाख चोपन्न हजार रुपये) त्याचेकडील सॅकमध्ये सोन्या चांदिचे दागिने मिळून आले. त्यास सदर सोन्या चांदीच्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने चार दिवसापुर्वी आरग गावातील पद्मावती मातेच्या मंदीरातील देवीच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेले असून ते चोरी केलेले दागिने विक्री करणेकरीता आला असल्याची कबुली दिली.
सदर बाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस वरील प्रमाणे मंदीर चोरीचा गुन्हा दाखल असल्याने लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी पलुस, मिश्रामबाग पोलीस ठाणेस मालमत्तेविरूद्धचे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / अनिल कोळेकर, दरिबा बंडगर, सागर लवटे, सागर टिंगरे, संदिप गुरव, नागेश खरात, सतिश माने, महादेव नागणे, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, इम्रान मुल्ला, संकेत मगदुम, सचिन धोत्रे, पोना / संदिप नलावडे, सोमनाथ गुंडे, उदयसिंह माळी, पोशि / विक्रम खोत, चापोशि / सुशांत चिले. पोशि/ शशीकांत माळी, पोशि / संतोष चव्हाण, पोशि/ कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, विवेक साळुंखे, सायबर पोलीस ठाणे
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.