येडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हद्दीतील एका ढाब्यासमोर शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास रिक्षा (mh10 ची 23 27) ला मागून येणाऱ्या चारचाकीने धडक दिल्याने रिक्षा मुख्य रस्त्यावरून दहा ते बारा फूट खाली पडली यामध्ये आक्काताई भुजंग एडके (वय वर्ष 70, रा. नागाव )व शारदा लक्ष्मण सुकणे (वय वर्ष 50, रा. इस्लामपूर धनगर गल्ली ता. वाळवा )या दोघी जागीच मृत झालेल्या आहेत. अक्काताई एडके यांना अर्धांग वायू झाल्यामुळे मागील चार महिन्यापासून त्या कोल्हापूर जिल्ह्यातील पोरले येथे औषध उपचार घेण्यासाठी जात होत्या आक्काताई यांना तेथील औषधांमधून फरक पडल्यामुळे आज शेवटचा कोर्स असल्याने ह्या मायलेकी इस्लामपूरहून रिक्षाने औषध आण्यासाठी निघाल्या मात्र येडे निपाणी फाट्या हद्दीत येतात पाठीमागून येणारे चार चाकी ने रिक्षाला जोरदार धडक दिले ही धडक इतकी जोरदार बसली की रिक्षा मुख्य रस्त्यावरून दहा ते बारा फूट खाली सेवा रस्त्यावर पडली .यामध्ये पाठीमागे बसलेल्या मायलेक दोघीही जागीच मृत्यू झाल्या तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाले .यामध्ये रिक्षाचे साधारण 30 हजाराचे नुकसान झालेले आहे. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील ,सलमान मुलाणी, पोलीस कॉन्स्टेबल बाबर यांच्यासह टीम घटनास्थळी दाखल झाली.
सदर घटनेवरून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील चार चाकी चालक रामदास नामदेव सुतार (रा.मोरेवाडी तालुका भुदरगड )याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .अधिक तपास कुरलप पोलीस करीत आहेत