हौसेला मोल नसतं ! हे नक्की कोल्हापूरमध्ये अशाच पद्धतीने हौसेला मोल नसण्याची एक स्पर्धा प्रत्येक वेळी दिसून येते ही स्पर्धा असते म्हशी आणि रेडकु पळविण्याच्या स्पर्धा. यामध्ये म्हैस आणि म्हैसचे मालक हे सहा महिन्यापेक्षा जास्त महिन्यांपासून तयारीमध्ये असतात ते यामध्ये म्हैस किंवा म्हशीचे रेडकु त्यांना प्रशिक्षण ,आरोग्य, योग्य खुराक ,सराव आणि मालकाचे आज्ञा पाळण्याची शिस्त ही अनेक महिन्यापासून लावण्यासाठी प्रयत्न करीत असतात .कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या स्पर्धा भरवल्या जातात सुमारे दोन लाखाहून अधिक बक्षीस संयोजकांतर्फे देण्यात येतात.
म्हशी पळविण्याच्या स्पर्धा या शनिवार पेठ येथील गवळी गल्ली ,पंचगंगा नदी घाट ,सागर माळ, कसबा बावडा ,पाचगाव या ठिकाणी रोडशो आयोजित केला जातो .अनेक वर्षांची कोल्हापूरकरांची ही परंपरा असून त्यांनी ती आजही जपलेली आहे .मार्केट परिसरामध्ये अनेक नागरिक हे म्हशी घेऊन गर्दी करताना दिसतात यावेळी शंभरहून अधिक म्हशी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.मंगळवेढा ,पंढरपूर ,बेळगाव मिरज ,बेगमपूर यासह महाराष्ट्र कर्नाटक मधून रेडकु व म्हशींचा सहभाग या स्पर्धेमध्ये लक्षणीय दिसून येतो.
स्पर्धेच्या दिवशी पंचगंगा नदीवर म्हशींना आंघोळ घातली जाते त्यानंतर त्यांना सजवून कसबा बावडा येथे आणले जाते. अनेक मशीनवर सुंदर नक्षीकाम ,सामाजिक संदेश तसेच गळ्यात व पायात घुंगरांची माळ, रिबीन, लांबलचक शिंगे रंगवलेली असतात . त्यावरती रुबाबदार तुरे इतकेच नाहीत तर कित्येक म्हशींच्या पायात चांदीचे तोडे अशा विविध प्रकाराने या सुंदरींना सजवले जाते आणि या सुंदरींना पाहण्यासाठी जिल्ह्यातून नाही तर बाहेरच्या जिल्ह्यामधूनही अनेक नागरिक गर्दी करत असतात.