आज पासून जन्मलेली मुले ही जनरेशन बीटा म्हणून ओळखली जाणार

Admin
By -




        आपली पिढी कोणती? एकानंतर एक अविष्कार होत गेले आणि त्या त्या काळानुसार  पिढीला एक नवीन नाव दिले गेले. आज पासून जन्माला येणारी पिढी नवीन जनरेशन ची होणारी आहे तिला या जगात जनरेशन बीटा या नावाने ओळखले जाणार आहे. 
        
         साधारणपणे कोणत्याही पिढीला मिळालेले नाव हे त्या काळामध्ये भेटणाऱ्या संस्कृती किंवा आरती घटनांच्या आधारे ठरवले जाते एखाद्या पिढीची सुरुवात केव्ह शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनांच्या आधारे म्हणजे युद्ध आर्थिक घटना किंवा कोणत्याही मोठा तांत्रिक बदल यावरती ठरवलं जातो या पिढ्यांचा काळ हा सहसा 15 ते 20 वर्षाच्या कालावधीचा असतो. 
पहिली पिढी 

       ग्रेटेस्ट जनरेशन 1901 ते 1927 

     या कालखंडामध्ये जन्माला आलेली पिढी महामंदीची झळ सोसणारी अशी होती या काळामध्ये जन्मलेले अनेक सैन्यात गेले आणि वर्ल्ड वॉर दोन लढले या लोकांनी कुटुंब पालन पोषण करी कामावर जास्त लक्ष केंद्रित केले या लोकांनी आपले अनुभव ,केलेल्या गोष्टी या पुढच्या पिढीकडे सोपून दिल्या. 

           द सायलेंट जनरेशन 1928 ते 1945 

        या काळामध्ये महामंदी आणि दुसरे महायुद्ध याच्या परिणामामुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखले जाते या पिढीतील मुले कष्टाळू स्वावलंबी होती झालेल्या युद्धानंतरच्या झळा या पिढीने झेललेल्या आहेत पण त्याबद्दल जास्त या पिढीने कधीही कुरकुर केलेली दिसून आलेली नाही. 
बेबी बुमर पिढी 1946 ते 1964 

          दुसरा महायुद्ध झाल्यानंतर लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली या बदलामुळे या पिढीला बेबी भूमर्स असे नाव देण्यात आलेले होते या पिढीने आधुनिकता स्वीकारले बेबी बुमर्स पिढीने लोकांनी आपल्या मुलांना नवीन पद्धतीने नवनवीन शिक्षण देत वाढवले. 
जनरेशन X 1965 ते 1980 

       जनरेशन एक्स साठी तंत्रज्ञान हे नवीनच होते इंटरनेट आणि व्हिडिओ गेम ची सुरुवात याच काळामध्ये झालेली आहे या पिढीतील पालकांनी आपल्या मुलांना सर्व प्रकारचे तंत्रज्ञान पद्धतीने सुविधा या देण्याचा प्रयत्न केला. 

जनरेशन Y 1981 ते 1996 

       जनरेशन y यालाच मिलेनिल्स म्हणून ही ओळखले जाते या पिढीतील लोकांनी सर्वाधिक बदल पाहिलेल्या आहेत आणि ते आत्मसातही केलेले आहेत या पिढीतील लोकांनी स्वतःला तंत्रज्ञानाने अपडेट ही केलेली आहे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत ही पिढी गेली आहे.

जनरेशन अल्फा 2010 ते 2024 

     ही पहिली पिढी आहे की जिच्या जन्मापूर्वी सोशल मीडिया इंटरनेट प्लॅटफॉर्म होते ही सर्वात तरुण पिढी ही नवीन पिढी आहे या पिढीतील मुलांचे पालक इंटरनेट मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या सहाय्यानेच मोठे झालेल्या आहेत आणि आपले प्रगतीमध्ये या सर्व गोष्टींचा वापर त्यांनी केलेला आहे. 

जनरेशन बीटा 2025 ते 2019 

जनरेशन बीटाचा कालावधी हा एक जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे 2025 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना असे म्हटले जाणार आहे ही मुले अशा जगात वाढतील जेथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जनरेशन बेटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता यायचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आहे. या कालावधीमध्ये जन्माला येणारी मुले ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून अधिक प्रभावशाली होणार आहे.