पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत त्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूजेचे साहित्य आणावे लागणार असे सांगितले त्या साहित्यासाठी तब्बल 36 लाख रुपये कांता वामन बनसोडे (वय वर्ष ६०) (राहणार देवापुर तालुका मान) हे प्रार्थना आरोग्य केंद्रातून कनिष्ठ लिपिक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते त्यांच्या ओळखीच्या संबंधित भोंदू मांत्रिका सह दोघांनी दैवी शक्ती व जादूटोण्याचा वापर करून पैशाचा पाऊस पडेल असे आमिष कांता यांना दाखवले त्यांच्याकडून साहित्यासाठी तब्बल 36 लाख रुपये फोन पे नी घेतले एवढेच नव्हे तर बनसोडे यांच्याप्रमाणे अन्य लोकांनी ही पूजेसाठी कोणी 12 लाख तर कोणी 8 लाख या भोंदू बाबा कडे दिले.
ठरल्याप्रमाणे पैशाचा पाऊस पाडून मांत्रिकाने घरातील देवीसमोर बनसोडे यांच्यासह अन्य लोकांना बंदिस्त असे सहा बॉक्स दिले यामध्ये तब्बल 30 कोटी रुपये असल्याचे त्याने सांगितले ,पण हे बॉक्स २१ दिवसांपूर्वी उघडायचे नाहीत असे हि त्यांना सांगितले. ते बंदिस्त बॉक्स बनसोडे व इतर लोकांनी घरी नेल्यानंतर 21 दिवस कधी पूर्ण होणार याची वाट पाहत होते. अखेर तो दिवस उजाडताच तोच मांत्रिकाने फोन करून सांगितले बॉक्स उघडू नका तांत्रिक अडचण आलेली आहे.
मांत्रिकाने दिलेले सहा बॉक्स उघडण्यापूर्वीच बनसोडे यांच्यासह अन्य तक्रारदार सर्वजण एकत्र आले .सर्वांनी मांत्रिकाचे आता काही ऐकायचे नाही आणि आपण बॉक्स उघडायचे असे ठरविले. बॉक्स उघडताना व्हिडिओ शूटिंग करायचे असे त्यांनी ठरवले हळूहळू त्याने सहा बॉक्स उघडले, सर्व बॉक्स उघडून झाल्यावर प्रत्येक तीस कोटी नव्हे तर चक्क वर्तमानपत्राची रद्दी त्या बॉक्समधून निघाली.