एकीकडे लग्नासाठी मुली मिळत नाही त्यामुळे अनेक तरुणांची लग्न रखडलेली दिसत असतानाच दुसरीकडे लग्न जमविण्याच्या.कॉम च्या माध्यमातून एकाने 25 हून अधिक महिलांना गंडाविलेली दिसून आलेले आहे लग्नाचे आमिश दाखवून महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे फिरोज निजाम शेख वय वर्ष 32 राहणार कोंडवा पुणे मूळ राहणार गंगावळण कळाशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पुण्यात अटक केले त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शहरातील एका घटस्फोटीत महिलेने . कॉम वर नाव नोंदणी केली त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणांनी तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्यानंतर त्या महिलेची ओळख वाढवत तिला शरीर संबंध ठेवण्यास यांनी भाग पाडले .तसेच मला व्यवसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वारंवार या महिलेकडून एक लाख 69 हजार रुपयाची रोकड आणि आठ लाख 25 हजाराचे दागिने उकडले ज्यावेळी या महिलेने फिरोज याच्याकडे लग्नाचा तगादा लावला तेव्हा त्यांनी मला ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने 10 जानेवारीला जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयताला अटक केले त्याचे एक लग्न झालेले असून कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
शेख याने आत्तापर्यंत 25 महिलांना गंडा घडल्याचे चौकशीत समोर आलेले असून त्यातील काही महिलांच्या कडून त्यांनी लाखो रुपये उकळलेले आहे यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला असून काही ठिकाणी अर्ज आहेत