सांगली जिल्हा पोलीस दल व सांगली जिल्हातील महाविदयालयांचे प्राचार्य व बँक मॅनेजर यांचे सोबत चर्चासत्राचे आयोजन

Admin
By -



२० डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालय मध्ये सांगली जिल्हयामधील बँक मॅनेजर यांचेसोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्रात ५० बँक मॅनेजर हजर होते. संदीप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी एक सी.सी.टी.व्ही. पोलीसांसाठी या धर्तीवर बँकेचे बाहेर कॅमेरा लावणे, बैंक सुरक्षा अनुषंगाने अलार्म सिस्टीम अदयावत करणे, बैंक व बँक परिसरात सी.सी.टी.व्ही. लावणे, सी.सी.टी.व्ही. चे योग्य पद्धतीने मॉनिटरींग करणे, कोणताही अनुचित अथवा फसवणूकीचा प्रकार आढळून आल्यास पोलीस यंत्रणेशी संपर्क साधणे, सायबर फ्रॉड बाबत बँकेची भूमिका, ए.टी.एम. मध्ये सी.सी.टी.व्ही. लावणे व सुरक्षा रक्षक नेमणे, बँकेत सुरक्षा रक्षक नेमून त्यांना बँक सुरक्षा अनुषंगाने सुचना देणे याबाबत सुचना पर मार्गदर्शन केले.



दि. २१ डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालय येथे जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयांचे प्राचार्य यांचे सोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चा सत्रात एकूण ८० कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयांचे प्राचार्य हजर होते. सदर चर्चा सत्रामध्ये संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी मार्गदर्शन केले.

चर्चा सत्रात सायबर तक्रारी/अवेअरनेस, रॅगिंग, ट्रॉफिक, अंमली पदार्थ सेवन/दुष्पपरिणाम/उपयायोजना व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित प्राचार्यानी त्याचे मनोगत व्यक्त केले. त्यांना येणा-या अडचणी व संबंधित विषय याबाबत आपले विचार मांडले.



संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली यांनी चर्चा सत्रत अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मनुष्य जीवनावर, विदयार्थ्यांवर होणारे दुष्पपरिणाम, अंमली पदार्थ कायदयातर्गत कायदेशीर उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा सन २०१२ मधील तरतुदी व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सुचना दिल्या. संगणक स्मार्ट फोन या सारख्या उपकरणाच्या माध्यमातून होणारे सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता, मोटार वाहन कायदा तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.

नमुद सर्व घटकाचे अनुषंगाने शौक्षणिक संस्थाची जबाबदारी काय आहे? अँटी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्ये, निर्भया पथकातील समन्वय ठेवणे, लैगिंक अत्याचार तक्रारी संदर्भात विशाखा समितीचे कार्य, स्कूल बसमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणेबाबत तसेच विदयार्थ्यांचे बाबतीत अनुसुचित घटना घडू नये या करिता प्रबोधन करणे, विदयार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधिनता व अंमली पदार्थाचे सेवन याबाबत करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी, महाविदयालय प्रशासन, पोलीस प्रशासन व पालक यांचे सयुक्त बैठकिचे आयोजन करावे, कॉलेज परिसरात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसवणे, महाविदयालय व महाविदयालय परिसरात विदयार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणे, पोलीस अधिका-यांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करणे व विदयार्थ्यामध्ये अपयश / नैराश्य यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याने त्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे इत्यादी विषयांवर संदीप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली व रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सुचना पर मार्गदर्शन केले.

तसेच सायबर तक्रारी/अवेअरनेस, रॅगिंग, ट्रॉफिक, अंमली पदार्थ सेवन/दुष्पपरिणाम/उपयायोजना व बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण याबाबत प्रबोधनपर पत्रके वाटप करण्यात आली.