सुरक्षिततेसाठी दागिने ठेवलेले लपूवून परंतु चोरट्याने ते देखील लांबवले

Admin
By -



आपले दाग दागिने चोरीला जाऊ नयेत म्हणून अनेक जण वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसून येतात पण सांगलीमध्ये एक प्रकार असा घडला की फ्लॅट मालकासह पोलीस देखील आश्चर्यचकित झालेली आहेत
            आपण बाहेरगावी जाणार त्यावेळेस चोरटे आपला बंगला फोडू नये जर त्यांनी फोडलाच तर त्यांच्या हाती आपले दागिने लागू नयेत म्हणून चक्क घरामधील फ्रिजमध्ये एका पिशवीमध्ये सव्वातीन लाखाचे दागिने ठेवले .परंतु चोरट्याने फ्लॅटमध्ये सर्वत्र दागिने व पैशाचा शोध घेता फ्रिजमध्ये पिशवी ठेवलेले सव्वातीन लाखाचे दागिने चोरट्याने लंपास केलेली घटना घडलेली आहे.

             हि घटना घडली विश्रामबाग परिसरातील विजय नगर येथील आशीर्वाद अपार्टमेंट मध्ये राहणारे संजय दत्तात्रेय सेवेकर (वय वर्ष 58) हे काही कामानिमित्त दिनांक 29 नोव्हेंबर रोजी त्याच्या घरातील सर्वजण सकाळी नऊ वाजता त्यांचे मूळ गाव म्हणजे खोकडपुरा (जिल्हा छत्रपती नगर) येथे गेले फ्लॅट बंद करून जाताना प्रवासात हे दागिने कोठे न्यायचे म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवायचे म्हणून त्यांनी फ्रिजमध्ये पिशवीमध्ये हे दागिने ठेवले आणि ते 16 दिवसासाठी ते गावी गेले 16 दिवस त्यांचा हा फ्लॅट बंद होता .फ्लॅट बंद असल्याचे बघून चोरट्याने बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला ,फ्लॅटमध्ये सर्वत्र झडती घेतली असता त्यांना काही मिळाले नाही. शेवटी त्या चोरट्यांचे फ्रिज कडे लक्ष गेले त्या फ्रिजमध्ये निळ्या रंगाच्या पिशवीतील सव्वा तीन लाखाचे दागिने चोरट्यांच्या हाती लागले, निळा पिशवीमध्ये सोन्याचे मंगळसूत्र ,झुब्याचा जोड, दोन सोन्याच्या वाट्या. सोन्याचे 25 मणी , दोन जोड चांदीचे पैंजण असा सुमारे सव्वातीन लाखाचा सोन्याचा ऐवज घेऊन चोरट्याने पलायन केले .सेवेकर दि 12 रोजी परत आल्यानंतर फ्लॅटमध्ये आत आले तेव्हा त्यांना फ्लॅट फोडल्याचे लक्षात आले त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला ,पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सेवेकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे