राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या त्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात सुनावणी करण्यात आली .
शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून ताराराणी सभागृहात महिला न्यायच्या अपेक्षेने आलेल्या होत्या त्यांची तक्रार ऐकून घेण्यासाठी शासकीय अधिकारी ,स्वयंसेवक, समुपदेशक वकील व पोलीस असे चार पॅनल बनवण्यात आलेले होते. प्रत्येक पॅनल समोर महिला ही तिची व्यथा सांगत होते दुपारी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या या जन सुनावणीत काही प्रकरणात तडजोडी झाल्या काही प्रकरणे भरोसा असेल कडे वर्ग करण्यात आली तर काही प्रकरणात नोटीस तर काही प्रकरणात थेट गुन्हे नोंदवण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केल्या.
या तक्रारीमध्ये महिला, पती, सासू-सासरे, सासरची मंडळी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही कधी संपत्तीसाठी ,कधी मुलांच्या ताब्यासाठी, स्वतःच्या आत्म सन्मानासाठी करिअरसाठी व्यसनी पतीच्या त्रासापासून मोकळे होण्यासाठी पतीच्या बाहेर खाली पणाला कंटाळून पुरुषप्रधान संस्कृतीच्या उंबऱ्या उंबरठ्याची चौकट मोडण्यासाठी त्यात घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते प्रत्येक कहानी ही वेगळी तर अनेक चटके सोडणारी जाणवत होते