आपल्याला जर आपल्या आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर रोज एखादे तरी फळ खावे असे डॉक्टर सांगतात पण सगळीच फळे आपल्या खिशाला परवडतील असे नसते मात्र पेरू हे एक फळ असे आहे की ते सहज उपलब्ध होऊ सर्वांचे खिशाला परवडणारे असे आहे हिवाळ्यात बाहेरून पोपटी आणि आतून गुलाबी रंगाचे पेरू बाजारात येतात तसेच पांढऱ्या असणाऱ्या पेरूच्या तुलनेत हे पेरू वेगळे कसे आहेत किती गुणकारी आहेत हे आपण जाणून घेऊ .
पेरू हे फळ हिवाळा आणि पावसाळ्यात येणारे फळ, हिवाळ्यामध्ये मिळणारे पेरू हे गोड आणि अधिक चविष्ट असतात, सध्या तर अनेक गृहिणी पेरू पासून अनेक विविध रेसिपी देखील बनवतात .पेरू खाणे महत्त्वाचे हे यासाठी की प्रथिनांचा आणि जीवनसत्वांचा समावेश पेरू असतो ते आरोग्यवर्धक असून त्यामुळे डोळ्यांचे, पोटांचे विकारही बरे होतात. पेरू तर गुणकारी आहेच त्याचबरोबर पेरूचे पान देखील अत्यंत गुणकारी मानले जाते.
पांढरा पेरू आणि लाल पेरू असे दोन पेरूचे प्रकार आहेत, लायकोपिन नावाच्या रंगद्रव्यामुळे लाल पेरूला लाल रंग येतो आणि लायकोपिन नावाचा रंगद्रव्य हा पांढऱ्या पेरू मध्ये नसतो त्यामुळे पांढऱ्या पेरूचा रंग हा पांढरा असतो.
पांढऱ्या पेरूची चव थोडी आंबट आणि गोड असते तर लाल पेरू हे अनेकदा गोडच असतात
पांढरा पेरू हा कडक असतो तर लाल पेरू हा थोडा मऊ असतो.
लाल पेरू पासून स्मुदी ,ज्यूस आणि आईस्क्रीम असे अनेक पदार्थ बनवतात .तर पांढऱ्या पेरू पासून चटणी ,लोणचे,कोशिंबीर असे अनेक पदार्थ बनवतात.
लाल पेरू मध्ये लायकोपिनचे प्रमाण जास्त असते गुणधर्माने परिपूर्ण असा लाल पेरू असतो त्याच्या सेवनामुळे त्वचा आणि हृदय हे चांगले राहते. तर पांढऱ्या पेरूमध्ये कमी प्रमाणात लायकोपीन असते तरी विटामिन सी आणि लोह चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते वेट लॉस,मधुमेही रुग्णांसाठी हे फळ अतिशय उपयुक्त ठरते ,पाळीच्या समस्येवर लाभदायी असेते,तसेच त्वचेचा पोत सुधारतो .
असे अनेक लाभ लाल आणि पांढऱ्या पेरूचे असतात