नदींच्या काठी अनेक पक्षी वावरताना आपल्याला दिसून येतात ,त्यांचे निरीक्षक करण्यासाठी ही अनेक जण निरीक्षक दरवेळी त्याबाबत नोंदी घेत असतात,
कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातीच्या शेकडो पक्षांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासामधून समोर आलेल्या असून त्यांनी त्याच्या नोंदी ही घेतलेल्या आहेत ,त्यामध्ये अनेक स्थानिक पक्षासह स्थलांतरितपक्षांचाही समावेश आहे .
कराडच्या कृष्णाकाठी मुबलक जैवविविधता लाभलेला असा हा परिसर याच जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षांचे निरीक्षण करून डॉक्टर सुधीर कुंभार यांच्यासह यांच्या टीमने नोंदी केलेल्या आहेत कराड जवळ कृष्णा नदीवरील खोडशी धरण परिसरात प्रीती संगम बाग विद्यानगर कृष्णापुर वाखाण परिसर टेंभू प्रकल्प येथे निरीक्षण व नोंदी केल्या गेल आहेत.
केलेल्या निरीक्षणाबद्दल डॉक्टर सुधीर कुंभार यांनी सांगितले की कराड परिसरात मोर लांडोर पानकावळे पाकोल्या सूर्य पक्षी व सुगरण या पक्षांच्या संख्येत वाढ झालेली आहे तसेच सुगरणीच्या घरट्यांची संख्या ही वाढलेली दिसून आलेली आहे वेडाराघू ,लाल मैना ,वटवट्या ,ट्राय कलर , सुभग ,हळद्या ,मिनी वेट ,तांबट ,पिंगळे, गव्हाणे घुबड यांच्याही नोंदी झालेल्या आहेत