सध्याला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे .मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण सांगली जिल्ह्याला मंत्रीपद देण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध पक्षातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत, यामध्ये विशेष करून लक्ष वेधी ठरत आहे ते म्हणजे सांगली जिल्ह्याचे मंत्रीपद जयंत पाटील यांच्यासाठीच राखून ठेवल्याचे मतदारसंघातून जोरदार चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे .भाजप किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट यापैकी एका पक्षात जयंत पाटील प्रवेश करतील असा अंदाज अनेकाने व्यक्त केलेला आहे ,मात्र याबाबत जयंत पाटील यांनी मौन बाळगलेले आहे परंतु इस्लामपूर मतदारसंघातील त्यांचे विरोधक आहेत जे भाजप ,राष्ट्रवादी अजित पवार गट किवा शिंदे सेनेचे अनेक स्थानिक नेत्यांना याबाबत अस्वस्थता वाटत आहे ,जर जयंत पाटील यांनी महायुतीत प्रवेश केला तर आपले भवितव्य काय? असा आणि जणांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मात्र याबाबत जयंत पाटील यांनी मन पाडलेल्या आहे जयंत पाटील यांचा निर्णय काय असेल याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.