पोलीस अधीक्षकांची कारवाई: लाचखोर महिला पोलीस हवालदार निलंबित

Admin
By -
          


              लाचखोर महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) निलंबित : सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची कारवाई:
         तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्या साठी पन्नास हजार रुपयाची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांना रंगेहाथ पकडल असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. लाचखोर महिला पोलीस हवालदाराच्या या करनाम्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या लाचखोर महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांना सेवेतून निलंबित करण्यात आल आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.