लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Admin
By -




पन्नास हजारची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांना अटक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई :
    तक्रारदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि चौकशीमध्ये मदत करण्याच्या साठी पन्नास हजार रुपयाची लाच घेणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांना रंग्यात पकडला असून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.



           तक्रारदारच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे. सदर तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरिता आणि यातील तक्रारदार यांच्या विरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्या करिता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांनी पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदारने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत सापळा रचण्यात आला. महिला पोलीस हवालदार मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) यांना पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनिषा नितीन कोंगनोळीकर (भडेकर) अटक करण्यात आली आहे.