जात, धर्म, पत्रिकेऐवजी मुला-मुलींना स्वावलंबी बनवा : ज्योती आदाटे*

Admin
By -

महर्षि वाल्मिकी ट्रस्टतर्फे कोळी समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात साजरा 



          सध्या लग्न जुळवताना जात, धर्म, पत्रिका पाहिली जाते. परंतु यामुळे लग्न यशस्वी होतात असे काही नाही. त्यामुळे पालकांनी  मुले-मुली स्वावलंबी आहेत का, सक्षम आहेत का याचा विचार केला पाहिजे. तर भविष्यात लग्ने यशस्वी होतील, असे प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ज्योती आदाटे यांनी केले.


            महर्षी वाल्मिकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित कोळी समाजाच्या वधू-- वर मेळावा झाला. यावेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. आदाटे म्हणाल्या, सध्या वधू-वर मेळावे मोठ्या प्रमाणात भरतात. परंतू त्या ठिकाणी वधू-वरांऐवजी पालकच असतात. वास्तविक पाहता मेळाव्याला मुलां-मलींनी हजेरी लावली पाहिजे. एकमेकांना भेटून विचार जाणून घेतले पाहिजे. पालकांनी मुलांवर लग्नाचे नाते अजिबात लादू नये. लादलेले नाते फार काळ टिकत नाही. त्यापेक्षा पालकांनी मुलांना स्वावलंबी बनवून लग्नाचा निर्णय घेण्यास त्यांना सक्षम केले पाहिजे. त्या पुढे म्हणाल्या, लग्न जुळवताना जात, पत्रिका, गुणनाडी याला प्राधान्य दिले जाते. परंतु मुला-मुलींची मने जुळली पाहिजेत. हल्ली लग्न जुळविताना बाजार मांडला जातो. नात्याचा व्यवहार होत आहे. त्यामुळे लग्न जुळवणार्‍या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांचे दर ठरले आहेत. हे फारच भयानक आहे. अशा दलालांमुळे मुला-मुलींची फसवणूक होऊ शकते. यापासून पालकांनी सावध राहिले पाहिजे. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, आर. जी. कोळी, शशीकांत कोळी, खानापुरे, विलास माने, सहदेव कोळी, संदीप राजमाने, उदय कोळी, अभिषेक सूर्यवंशी, संस्थेचे सर्व पदाधिकारी व असंख्य संख्येने पालक उपस्थित होते.