सांगली बाजारात देशी विदेशी फळांची रेलचेल

Admin
By -




       हिवाळ्यामध्ये अनेक जण फळांवरती ताव मारताना दिसून येतात हिवाळ्यातील अल्हाददायक वातावरणात आरोग्याची भर टाकण्यासाठी सांगली बाजारपेठेत देशी विदेशी फळांची रेलचेल झालेली दिसून येत आहे त्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाजात असल्यामुळे सांगलीकर त्यावरती भरभरून ताव मारताना देखील दिसून येत आहेत

मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे उपवासासाठी आणि पूजेसाठी फळांची विशेष मागणी असल्याचे दिसून येते त्यामुळे सध्या फळांची रेलचेही होतच आहे यामुळे बाजारात सध्या संत्री, पेरू, मोसंबी, सिताफळ ,द्राक्षे ,सफरचंद ,पपई ,कलिंगड अशी अनेक फळे दिसून येत आहेत.
सध्या सांगलीकरांचे लक्ष वेधत आहेत ते कॅलिफोर्निया मधून आलेले लाल काळे द्राक्षे ते सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत हे गोल गरगरीत द्राक्षेत चवीला फार गोड नसले तरी सांगलीकरांच्या घरांमध्ये या फळाने जागा मिळवलेली आहे