हिवाळा सुरू झाला, संत्री बाजारात येऊ लागली पण गोड संत्रीची पारक करायची कशी?

Admin
By -




हिवाळा सुरू झाला की झाला बाजारात दिसायला लागतात ती संत्री जवळपास शहरातील प्रत्येकच बाजारपेठेमध्ये सध्या संत्री यायला सुरुवात झालेली आहे.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, ऑंटी ऑक्सिडटस, फायबर हे मोठ्या प्रमाणावर आढळत असते त्यामुळे संत्री हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम आणि फायदेशीर तसेच त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असणारे फळ आहे
अनेकदा असे होते की बाजारातून आपण संत्री आणतो पण ती इतकी आंबट असतात की खाण्याची अजिबात इच्छा होत नाही म्हणूनच
गोड संत्र्याची पारख कशी करावी हे आपण बघू
  • आपण संत्री घेतो त्यावेळेस संत्र्याचा आकार हा मोठा असावा मोठा आकार म्हणजे संत्री जास्त रसाळ आणि गोड असतात.
  • ज्या संत्र्याची साल थोडी जाड आणि थोडेसे मऊ असलेले संत्रे हे गोड असते तर आंबट संत्र्याची साल ही पातळ आणि आतल्या भागाला साल चिटकून बसल्यासारखी वाटते
  • संत्री जेव्हा आपण हातात उचलून घेतो तेव्हा ती जर वजनदार असतील तर ती जास्त रसाळ आणि गोड असतात.
  • संत्री घेताना जर संत्र्याची साल नखाने थोडी खरवडली तर त्यातून छान गोड सुवास आला तर ती संत्री गोड असतात