प्रवासी जीपच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह आई जागीच ठार

Admin
By -


तासगाव रस्त्यावर कवलापूर येथे भरतगाव प्रवासी जि पुणे दुसाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण जागीच ठार
विश्वास म्हारगुडे हे मूळचे तळेवाडी (ता. आटपाडी )येथील रहिवासी असून सांगलीमध्ये ते सध्या वास्तव्यास असून सांगली परिसरात ते हमालीचे काम करतात. बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी ते त्यांची पत्नी दिपाली विश्वास म्हारगुडे (वय वर्ष 28) मुलगा सार्थक (वय वर्ष 7) राजकुमार (वय वर्ष 5) सर्व रा आंबा चौक यशवंत नगर सांगली हे सर्वजण त्यांची दुचाकी (एम एच 10 ए एच 87 32) या दुचाकीवरून लग्नासाठी निघाले होते .कवलापूर ते कुमठे फाटा या दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जिपने विश्वास यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले, दुचाकी वर समोर बसलेला राजकुमार याच्या गळ्याला पत्रा लागून तो जागीच ठार झाला, तर दुसरा मुलगा व पत्नी यांच्या डोक्याला गंभीर मार लागून ते जागीच मृत्यू झाले आणि विश्वास यालाही गंभीर दुखापत झाली .
अपघात झाल्यानंतर रस्त्यावरील वाहन चालकानी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली परंतु समोरील चित्र अंगावर काटा आणणारे असे होते. जीप चालक तेथे न थांबता पसार झाला. सांगली ग्रामीण पोलीस यांना याची माहिती मिळताच ते तेथे तात्काळ गेले अपघात स्थळी शेकडो नागरिकांची गर्दी जमली होती .दोन भावंडासह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून सर्वजण हळूहळू व्यक्त करीत होते