मुलींची संख्या घटल्यामुळे आता उपवर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे हे खूपच अवघड झालेले आहे.
सध्या लग्न ठरणे ही एक अवघड काम झालेली आहे, मुलीच्या घरच्यांच्या मुलाकडून ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करताना मुलाच्या कित्येकदा नाके नऊ येते अशाच वेळी अनेकदा अशा मुलांना बिन लग्नाचे राहावे लागते किंवा वय झाले तरी अनेक वर्ष अशा मुलांना मुली मिळत नाहीत.
आपल्याला हवी तशी मुलगी किंवा मुलगा मिळावा यासाठी सध्या वधुवर सुचक मंडळ हे मोठ्या प्रमाणात कार्यरत झालेले दिसते ,वधू वर सूचक मंडळांना बायोडाटा पाठवूनही त्यांच्याकडून जशा मुली येतात ते बायोडाटा त्यांना पसंत नसतात. अश्याच एका नवरदेवाने चक्क अनोखी शक्कल लढवली .
आपल्याला नवरी मिळावी यासाठी एका इच्छुकाने काय केले हे बघा
नवरदेवाने चक्क गारगोटी कोल्हापूर रस्त्यावरील कुर् या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या दगडावरच आपल्या बाबतची संपूर्ण माहिती असणारा बायोडाटा त्या दगडावरती चिटकवला यामध्ये लिहिताना त्या तरुणाने लिहिले की पुणे येथील कंपनी येथे इंजिनिअर म्हणून तो कार्यरत असून त्याचा वार्षिक पगार आठ लाखाचा पुणे येथे टू बीएचके फ्लॅट असून वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे तसेच यामध्ये वधूसंबंधीच्या अपेक्षा या सर्व बाबतींचा उल्लेख या वराने केलेला आहे याशिवाय संपर्क साठी त्यांनी त्याचा मोबाईल नंबर ही दिलेला आहे
याचा परिणाम म्हणून या रस्त्यावरून येणारे जाणारे आपला बायोडाटा बघतील आणि येणारे जाणारे फोन करतील असे या तरुणाला कदाचित वाटले असेल