मिरज मध्ये, ख्रिसमस अर्थात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिचन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. चर्च मध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेस शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते. शंभर वर्षा पूर्वीचे मिरजेतील ऐतिहासिक चर्च, प्रसिद्ध अशी आकर्षक बेल (घंटा) आणि सर डॉ. विल्यम वानलेस यांच्या योगदाना मुळेच आज ‘मिरजेला आरोग्य पंढरी’ म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेची प्रमुख वैशिष्ठे आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे. अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेच नाव जगातिक पातळीवर प्रसिद्ध आहे. या पैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षा पूर्वीच ऐतिहासिक चर्च आहे. मिरज चर्च मध्ये ख्रिस्ती बांधवांच प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणाहून प्रार्थने साठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्च मध्ये येत असतात. ख्रिस्ती समुदाय बरोबरच, सर्वधर्मीय लोक मिरज चर्च मध्ये श्रद्धेने येतात. आजच्या नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकमेकांना ‘हॅपी ख्रिसमस’ अशा शुभेच्छा देण्यात आल्या. रेव्हरंट श्रीनिवास चोपडे यानी नाताळ निमित्त प्रभू येशूची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे, असा संदेश दिला.
यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी नगरसेवक संदीप आवटी, माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक महंमद मनेर, भाजपाचे नेते गजेंद्र कल्लोळे, डॉ. विकास पाटील, दिगंबर जाधव, सचिन जाधव यांच्यासहित विविध पक्ष, संघटना मधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.