बापासाठी लेक प्रचाराच्या मैदानात ...

Admin
By -


 संजय काकांच्या विजयासाठी  वैष्णवी पाटील यांच्या पायाला भिंगरी




      

      संजय काका पाटील यांच्या विजयासाठी  तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील गावागावात वैष्णवी संजय काका पाटील  यांनी पायाला भिंगरी बांधून  प्रचार सुरु आहे.काकांनी केलेली कामे लोकांना सांगत त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधणाऱ्या वैष्णवी पाटील यांना महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. बापासाठी उन्हातानात प्रचार करणाऱ्या  लेकीला मतांच्या रूपाने लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत.

    यावेळी लोकांशी संवाद साधताना वैष्णवी पाटील म्हणाल्या सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी महायुतीच्या माद्यमातून दहा वर्षाच्या कारकिर्दीत संपूर्ण सांगली जिल्ह्यासह तासगाव -कवठेमहांकाळ मतदार संघात पाणी योजना, रस्ते ,आरोग्य ,शेती व्यवसाय व लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांना पीएम किसान योजना तेवडीच,महाराष्ट्र सरकार मार्फत वेगळी किसान योजना, महिलांना एस.टी. प्रवासात अर्धी तिकिट, शेतकऱ्यांना लाईट बिल माफ, चार नॅशनल हायवे, रेल्वे दुपदरीकरण, ताकारी टेंभू म्हैसाळ योजनेस वाढीव मंजुरी, या दृष्टीने जी कामे केली त्या जोरावर संजय काका पाटील यांचा तासगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजयी होणारा असून आता खऱ्या अर्थानं परिवर्तनाची लढाई तासगाव -कवठेमहांकाळ मतदार संघातील काकांच्यावर प्रेम करणारे व महायुती वर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व महिला यांनी हाती घेतली असून संजय काकांचा विजय हा निश्चित असल्याचे वैष्णवी संजयकाका पाटील म्हणाल्या 
      तासगाव तालुक्यातील राजापूर ढवळी वंजारवाडी तुरची ,निमनी, नेहरू नगर येथील प्रचार दौऱ्यात बोलत होत्या. त्यांनी आपल्या दौऱ्यात प्रत्येक गावात घरोघरी जाऊन संजय काका पाटील यांच्या विजयासाठी या विभागातील प्रमुख महिलांना घेऊन प्रचार केला.ढवळी येथील ग्रामदैवत श्री शिव शंभो मंदिरात दर्शन घेऊन प्रचार पदयात्रेला सुरवात झाली.
              तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघाबरोबर ढवळी ,वंजारवाडी सह परिसरातून वाढता पाठिंबा मिळत असून संजयकाकांच्या विजयासाठी त्यांच्या कन्या वैष्णवी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिलांचाही प्रचारात मोठा सहभाग दिसून येत आहे.
       त्यांनी ढवळी येथे बोलताना सांगितले संजय काका पाटील यांना संपूर्ण मतदारसंघात वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत.अनेक मार्गाने मतदारांना आकर्षित करण्याची धडपड सुरू केली आहे .संजय काका पाटील यांच्यावर निम्मा तासगाव तालुक्याचा सातबारा निघतो असे घाणेरडे आरोप करून दिशा भूल चालू आहे. पण संजय काका पाटील हे हडाचे कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांसाठी जी धडपड केली आहे आपले कार्यकर्ते तयार केले आहेत. ते कदापि याविषयी विश्वास ठेवणार नाहीत व ते कधीच खोट्या आरोपांना भीक घालणार नाहीत हा विश्वास मागील अनेक निवडणुकातुन झालेल्या मतदानावर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी परिवर्तनाची नांदी आटळ असून मोठ्या मताधिक्याने संजय काका पाटील यांचा विजय करण्यासाठी या मतदारसंघातील महिला , पुरुष मतदार व युवा मतदार तयार असून येत्या २३ तारखेला परिवर्तन विजय उत्सव आपलाच असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच सुनंदा चंद्रकांत पाटील, वैशाली सुरेश पाटील, कविता अशोक माने, वैशाली अजित पाटील, कल्पना सुनिल पाटील, सुनिता आनंदराव पाटील, विजया उत्तम पाटील प्रियंका अरविंद बोबडे.सह शेकडो महिला पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.यावेळी महिला सह सुरेश पाटील, अशोक माने ,चंद्रकांत बकरे, बाळा पाटील, सचिन शिंदे, प्रमोद जाधव, दादा देवकुळे, बाळू मुल्ला ,रोहन बोबडे, जैद्द मोमीन, प्रतीक पाटील, अक्षय जाधव, अवधूत पाटील ,विष्णू काळे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.