सांगली जिल्ह्यात मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार कोण?

Admin
By -







सांगली जिल्ह्यामध्ये भाजप महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता मंत्रीपदची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या संदर्भात जोरदार चर्चा सुरू झालेली दिसत आहे
    विद्यमान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे सगळेचे आमदार सुधीर दादा गाडगीळ खानापूरचे सुहास बाबर जतचे गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता सर्वत्र व्यक्त केली जात आहे
सांगली जिल्ह्यातील आठ जागांपैकी पाच ठिकाणी महायुतीने स्वतःचा झेंडा फडकवला सुधीर दादा गाडगीळ हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून तर खाडे हे चौथ्यांदा मिरजेमधून आमदार म्हणून निवडून आलेले आहे यांचा आमदार आणि मंत्रीपदाचा दीर्घ हा अनुभव बघता त्यांच्या वाट्याला कदाचित वजनदार खाते येऊ शकेल
     महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर हे पण मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते आता थेट लोकांच्यातून निवडून आल्याने मंत्रि मंडळाचे दावेदार मानले जात आहे
      दिवंगत अनिल बाबर यांचे वारसदार म्हणून सुहास बाबर यांनी निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवले त्यांनाही राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनिल बाबर हे एकनिष्ठ राहिले शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनिल बाबर यांनी पहिल्याच टप्प्यात त्यांच्यावर बरोबर राहून निष्ठेची पावती म्हणून सुहास बाबर यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते