निवडणुकीत जनतेच्या व कार्यकत्यांच्या ताकदीमुळे आपला विजय नक्कीच ! अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील

Admin
By -




         सांगली विधानसभा   मतदारसंघामध्ये अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना मिळत असलेल्या  जनतेच्या पाठींब्यामुळे आपला विजय निश्चित आहे.

          अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना  ग्रामीण भागात  प्रचार दौऱ्यादरम्यान जनतेकडून मोठा पाठींबा मिळत आहे. जनतेकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यामुळे माझे मनोधैर्य वाढले आहे. आगामी निवडणुकीत जनतेच्या या ताकदीमूळे आपला विजय नक्कीच आहे. या विधानसभेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पाण्याच्या असुविधा वाड्यावस्त्यांवर आहेत. या पायाभूत सुविधांचे आपल्याला समाधान करायचे आहेत. रोजगाराची प्रचंड समस्या आहे ती सोडवायची आहे. रोजगारावर विशेष काम करण्याचे अभिवचन जनतेला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिले . 

              शेतकरी व सामान्य जनता हा विकासाच्या प्रक्रियेत केंद्रबिंदू असला पाहिजे. या संपूर्ण विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्याचे अभिवचन देते " असे वक्तव्य अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी बोलताना सांगितले. 
           आज महानगरपालिकेच्या वॉर्डातील वॉर्ड नं 9 व 10 या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळाला या संवाद रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता पक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

          यावेळी नगरसेविका रोहिणी  पाटील, नगरसेवक संतोष पाटील, सत्यजित पाटील,  गजानन माळी, जगजीवन भाटे, महमंद शेख, छोटु ऐनापुरे, फिरोज ऐनापुरे, शब्बीर ऐनापुरे, दिलीप भोसले, रणजीत निंबाळकर, राजु निंबाळकर, विजय भोसले, भंडारे साहेब, याच्यासह , पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.