धक्कादायक जमिनीच्या वादातून एकाचा खून
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजप स्टार्ट अप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा शेत जमिनीच्या वादातून त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निघृण खून करण्यात आला आहे ,याप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांन कडून अटक करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की सुधाकर खाडे यांनी मिरजेमधील पंढरपूर रस्त्यावरील राम मंदिरालगत असणाऱ्या चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबीय व सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
यावेळी रागातून कार्तिक चंदनवाले याने कुऱ्हाडीने अचानक मागून सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथे मोठा एकच गोंधळ उडाला . हल्ला होताच खाडे यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयात त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.
खुनानंतर कार्तिक चंदनवाले या आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक करण्यात आले. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली . याखूना प्रकरणी गांधी चौक पोलिसानी कार्तिक चंदनवाले, लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खुनाचा अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करीत आहेत.