सांगली विधान सभा निवडणुकीत जोरदार वेगवान घडामोडी घडत आहेत. आज सांगली उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यानी चक्क अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जाहीर पाठिबा देऊन आम्ही तुमच्या पाठींशी खंबीर पणे उभे राहणार असल्याची ग्वाही पदाधिकाऱ्यानी दिली. कै. मदन पाटील याच्या पश्चात जयश्री पाटील यांनी सांगली शहरातील विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे . चाळीस वर्षातुन एक महिला आमदार विधानसभेत पाठविण्याची संधी आली आहे. ती आपण सर्वांनी पार पडुन जसा सांगलीचा आवाज संसदेत गाजला, तसा आवाज विधीमंडळात गाजणार आणि शहरा बरोबर ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लागणार म्हणून सर्वांनी जयश्री मदन पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असे सांगितले.
आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी जीवाचे रान करून चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदाच एका नारीला आमदार म्हणून निवडून आणणार. मदन भाऊ असताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठ करण्याचं काम केलं. त्यांच्या त्या कार्याची पोचपावती म्हणून आम्ही जयश्री पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.
यावेळी उपशहर प्रमुख प्रताप पवार , राम काळे, दिनेश शेलार , धनाजी कोळपे, कैलास वडर, विनायक जगताप,सुरज पोवार, आदी उपस्थित होते.