. मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुरेश (भाऊ) दगडु खाडे यांचा मिरज ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू असून ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये प्रचार दौऱ्यास अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये केलेल्या विकास कामांमुळे व मतदार संघामध्ये ठेवलेल्या जनसंपर्कामुळे भागातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग दिसत आहे. या प्रचार दौऱ्यादरम्यान गावागावातील अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत व खाडेभाऊंना विजयाच्या शुभेच्छा देत आहेत. यावेळी मिरज ग्रामीण भागातील जानराववाडी, संतोषवाडी, सलगरे, चाबूकस्वारवाडी या गावामध्ये प्रचार दौरा करण्यात आला.
गावातील नागरिकांच्या मागणी व गरजा लक्षात घेऊन गावामध्ये विकास कामे झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान बघायला मिळत आहे. यापुढेही गावामध्ये विकास करण्यास कटीबध्द असणार आहे. गावाला निधी कमी पडु देणार नाही, अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधताना दिली. मोठ्या संख्येंने गावातील मतदान करून घ्यावे असे विनंती केली. आपली सेवा करण्याची मला पुन्हा एकदा संधी देण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबुन आपले बहुमुल्य मत द्यावे. मी नक्कीच संधीचे सोने करून जानराववाडी, संतोषवाडी, सलगरे, चाबूकस्वारवाडी गावाचा व तालुक्याचा विकास करेन. प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित राहुन मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.