सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरज ग्रामीण भागामध्ये प्रचार दौऱ्यास मोठा प्रतिसाद

Admin
By -
        




     मिरज विधानसभेतील भाजपामहायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे यांचा प्रचार दौरा सुरू असून मिरज ग्रामीण भागामध्ये प्रचार दौऱ्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघातील विविध संघटनांनी डॉ. सुरेशभाऊ खाडे यांना आपला सक्रिय पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे मतदार संघामध्ये खाडे यांना ताकद मिळत आहे. आज मिरज ग्रामीण भागातील सावळी, कवलापुर या गावांमध्ये प्रचार दौरा पार पडला. 
यावेळी ते बोलताना म्हणाले की, आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने गेल्या पंधरा वर्षामध्ये मला मिरज विधानसभा मतदार संघातील सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना समाधान लाभले आहे. यापुढेही मी जनसामान्यांची सेवा करण्यात आपल्या पदाचा वापर करेन अशी ग्वाही देतो. मिरज ग्रामीण भागाचा विकास करताना कोणताही घटक विकासापासून वंचित राहु नये यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या मतदार संघामध्ये आणल्या आहेत. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना जास्तीत जास्त नोंदणी करून देण्यासाठी माझे कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापला. तसेच बांधकाम कामगारांना नोंदणी करणेस कोणतीही अडचणी होऊ नये म्हणून गावांमध्ये कॅम्पचे आयोजन करून बांधकाम कामगारांची नोंदणी केली. विकास कामाचा आराखडा सांगायचा झाला तर मिरज मतदार संघाचा आलेख चढत्या क्रमांकावरच आहे. आरोग्याच्या दृष्टीने सोयी सुविधा निर्माण करुन देण्यात आल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडुंना प्रोत्साहन दिले. त्यांना लागणारी सर्व शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये डिजीटल शाळा, स्मार्ट अंगणवाडी सारखे नाविन्यपुर्ण उपक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबविण्यात आले. 



म्हैशाळ उपसा सिंचन कडील विजबिल माफी मिळवून दिली. ऐन उन्हाळ्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती उद्भवत असताना म्हैशाळ उपसा पंप वर्षभर अविरत सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे मिरज भागातील शेती पिकांचे होणारे नुकसान टळले. मिरज ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे सभागृह, ग्रामसचिवालय, सामाजिक सभागृहे, भवन यांची बांधणी केली. कलाकार मानधन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त कलाकारांना मानधन मंजुर करून दिले. ही सर्व कामे करू शकलो ते आपल्या सर्वांच्या आशिर्वादामुळेच अशी भावना त्यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली.