आगीने घेतले रौद्र रूप

Admin
By -









मिरज शहरातील वैरण बाजार येथील एका झ रात्री उशिरा भीषण आग लागली. रात्री उशिरा लागलेल्या या आगीमुळे सर्व परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. या लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर दुकानातील साहित्य जाऊन खाक झाले
असून दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे.

रात उशिरापर्यंत परिसरात मोठी गर्दी झाली होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरजेतील वैरण बाजार येथील एका दुकानाला रात्री उशिरा आग लागली. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली . आग विजविण्यासाठी मिरजेसह सांगली आणि कुपवाड येथील तीन बंब मागवण्यात आले होते
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. पण रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नी दलाच्या जवानांना यश आले. मिरज शहरातील मुख्य भागात लागलेल्या आगीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. महावितरणाच्या कर्मचारी घटन स्थळी तातडीने धाव घेत वीज पुरवठा खंडित केला.
सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली नियंत्रण मिळवले.