श्री दत्त इंडिया प्रा., लि. सांगली (ऑपरेटर ऑफ वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,सांगली) या कारखान्याचा आठवा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा चेअरमन, खासदार विशालदादा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुजाताई (वहिनी) विशालदादा पाटील यांचे हस्ते दस-याचे शुभ मुहूर्तावर दि. १२/१०/२०२४ रोजी सकाळी संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे चेअरमनसो खासदार श्री. विशलदादा पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना आहवान केले की आपला जास्तीत जास्त ऊस आपले कारखान्यास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करणेचे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सर्व संचालक, शेतकरी सभासद,ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगारवर्ग, वसंतदादा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, श्री दत्त इंडिया प्रा.लि.,चे व्हा. प्रेसिडेंट मृत्युंजय शिंदे, जनरल मॅनेंजर मोरे साहेब, फायनान्स मॅनेंजर अमोल शिंदे, शेती अधिकारी मोहन पवार, वर्क्स मॅनेंजर, चिफ केमिस्ट, साखर कामगार युनियन सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन यांनी मनोगत व्यक्त केले की, कारखाना सभासदांना सवलतीच्या दराने दस-याचे शुभ मुहूर्तावर साखर वाटप सुरु करणेत आले आहे. सदर साखर वाटप हे सभासदांचे सोईसाठी गटवाईज सुरु करणेत आले आहे. यामुळे सभासदाची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने तरी सर्व सभासदांनी गटवाईज आपली साखर नियोजित तारखेच्या प्रमाणे नेऊन सहकार्य करावे.