मनपा क्षेत्रातील विविध पक्षातील माजी नगरसेवक व नगरसेविकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

Admin
By -






          सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील विविध पक्षातील मा. नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.मुंबई येथील प्रदेश कार्यालय येथे मा उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नगरसेविका स्वातीताई पारधी,माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका राणी मोरे, सां.मि.कु. महानगरपालिकेच्या माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे आदी नगरसेवक,नगरसेविकांचा पक्ष प्रवेश तसेच अ‍ॅड. वसुधा कुंभार, रुकसाना कादरी, कल्लाप्पा कांबळे,प्रवीण बाबर, दयानंद ऐवळे,प्रसाद पाटील आदि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश व नियुक्त्या पार पडल्या.
       याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी,प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विष्णू माने, शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान,विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरात, व अन्य मान्यवर उपस्थित होते.