चेक पोस्ट वर इतकी मोठी रोकड मिळाल्याने सर्वत्र एकच खळबळ

Admin
By -






        सध्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाचं भरारी पथक विविध ठिकाणी चेकपोस्टवर अनेक वाहनांची तपासणी करत असताना दिसून येते. तसेच खेड शिवापूर टोल नाक्याजवळवाहनांची तपासणी होत असताना एका खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड सापडल्याचं उघड झालं आहे. ही रक्कम सांगोला इथं नेण्यात येत होती. सध्या पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी हे या प्रकाराचा तपास करत असून निवडणुकीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात  रोकड सापडल्यामुळे मुळे सर्व राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
         पुणे सातारा महामार्गावर पोलिसांनी ही कारवाई केली असून. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ एका वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम हि जवळपास ५ कोटींपर्यंत असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुणे सातारा महामार्गावरील रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सोमवारी दुपारपासून पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्याजवळ नाकाबंदी केली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास एक संशयित वाहन पोलिसांना आठळून आले असता, पोलिसांनी हे वाहन रोखून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात वाहनात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली. सध्या खेड शिवापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात याबाबत अधिक तपास सुरू आहे.