सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांच्या विजयासाठी सांगली व ग्रामीण भागातील सारे काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. आज माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी विजय बंगला येथे विधानसभा नियोजना संदर्भात सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सुचना दिल्या.
माजी मंत्री प्रतीक पाटील आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जयश्री वहिनींना विजयी करायचा निर्धार पक्का करण्यात आला. जयश्री पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून लढायचा निर्धार केला असून त्यांच्या विजयासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील सक्रिय झाले आहेत. आज त्यांनी सांगली शहर व ग्रामीण भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सूचना केल्या.
खासदार विशाल पाटील यांच्या दणदणीत विजयानंतर आता सांगली शहरातील व ग्रामीण भागातील काँग्रेस कायकर्ते रिचार्ज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची आज प्रतिक पाटील यांनी बैठक घेऊन त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. सूचना केल्या.
लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर आता बापू व अण्णा गट एकत्र आले असून खासदारकी नंतर आमदारकीसाठीही ते सक्रिय झाले आहेत. प्रतिक पाटील यांनी जयश्री वहिनीं निवडणुकीचे नियोजन हाती घेतले असून यामुळे प्रचाराला वेग आला आहे.