भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगली विधानसभा क्षेत्रासाठी तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटते. मी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जेपी नड्डा, तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
आधी मी राजकीय निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता, पण भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी स्वतः येत असल्याकारणामुळे आणि तसेच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षादेश अंतिम असतो म्हणूनच मी पक्षादेश मान्य करून उमेदवारी स्वीकारत आहे व माझा निर्णय मागे घेतो . निवडणुकीला मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर येत आहे.
सांगलीच्या जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास पाहून मी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पक्षाकडून मिळालेली ही संधी मला विशेष प्रेरणा देणारी आहे. या निर्णयामुळे माझ्या सेवेला नव्याने बळ मिळालं आहे आणि सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकत्रितपणे अधिक सक्षम पावले उचलू.
भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली सांगलीच्या हितासाठी कार्यरत राहण्याचं वचन मी पुन्हा देतो. तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा हीच माझी प्रेरणा आहे.
धन्यवाद,
*सुधीर दादा गाडगीळ*
आमदार, सांगली..