ज्यांना नवीन नोटा मिळाल्या त्यांची जणू दिवाळीत दिवाळी

Admin
By -



याबाबतची अधिक माहिती अशी की शनिवारी सकाळी साडेआठ वाजता सुमारास काही विद्यार्थी आटपाडी शहरातील शुक्र ओढ्यात अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ये जा करत असताना ओढ्यातून गदिमा पार्क कडे जाणाऱ्या छोट्या पुलाशेजारी ओढ्यामध्ये 500 नोटा दिसल्या त्यावेळी त्यांनी ते पाण्यात जाऊन पाहिले असता त्यांना 500 अनेक नोटा मिळाल्या शनिवारी बाजार असल्यामुळे त्या रस्त्यावर अनेक विक्रेते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने ये जा करीत होते त्यांनी तेथे एकच गर्दी केले अनेकांनी ओढ्याच्या सांडपाण्यात जाऊन शोध मोहीम ही सुरू केले काहीजणांना खऱ्या 500 च्या नोटा मिळाल्या तर काहीजणांना 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा मिळाल्या .शंभर रुपये मूल्याच्या जुन्या छपाईच्या नोटा ही ओढ्यात मिळून आल्या काही नागरिकांना जुन्या नोटा सापडल्याने त्यांची फसगत झाली तर काहीजणांना  नव्या नोटा सापडल्या नवीन नोटा ज्यांना सापडल्या त्यांना मात्र दिवाळीचा बोनसच मिळाला